नवी दिल्ली : अंदमानातील चक्रीवादळात अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुखरुप सुटका झालीये.
अंदमानमध्ये गेल्या पाच दिवसांपासून वादळ सुरू असल्याने देशभरातील चौदाशे पर्यटक अडकलेल होते. या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी नेव्हीच्या सहा बोटी पोर्ट ब्लेअरवरून पाठवण्यात आल्या होत्या.
तीन आयएएफ चॉपर्सही पाठवण्यात आली होती. पोर्ट ब्लेअरपासून 40 कि. मी अंतरावर नील आणि हॅवलॉक बेटांवर हे पर्यटक अडकले होते. यामध्ये पुण्याचे 55 ते 60, ठाण्याचे 16 आणि नाशिकचे 2 पर्यटक अडकल्ले होते. आता मात्र देशभरातले सर्व पर्यटक सुखरूप परतलेय.