'गार्ड ऑफ ऑनर'चं नेतृत्व करणारी ती महिला पूजा ठाकूर

राष्ट्रपती भवनात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना  'गार्ड ऑफ ऑनर' चे देण्यात आलं, त्यावेळी नेतृत्व करणारी ही महिला कोण? असा प्रश्न सर्वांना पडला होता, नेतृत्व करणारी ही महिला होती विंग कमांडर पूजा ठाकूर. 

Updated: Jan 25, 2015, 11:19 PM IST
'गार्ड ऑफ ऑनर'चं नेतृत्व करणारी ती महिला पूजा ठाकूर title=

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना  'गार्ड ऑफ ऑनर' चे देण्यात आलं, त्यावेळी नेतृत्व करणारी ही महिला कोण? असा प्रश्न सर्वांना पडला होता, नेतृत्व करणारी ही महिला होती विंग कमांडर पूजा ठाकूर. 

देशात पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या अध्यक्षांना एका महिला अधिकाऱ्याने मानवंदना दिली.

२१ तोफांची सलामी देऊन ओबामा यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आले. त्यानंतर लष्कराच्या विंग कमांडर पूजा ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून 'गार्ड ऑफ ऑनर'ची मानवंदना देण्यात आली.राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात 'गार्ड ऑफ ऑनर' चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.  

 यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी म्हटलंय, बराक ओबामा यांना 'गार्ड ऑफ ऑनर' ची मानवंदना देणाऱ्या पथकाचे नेतृत्व करायला मिळालं, ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.