लग्नात सेलिब्रेशनदरम्यान हवेत गोळीबार, नवरदेवाचा मृत्यू

लग्नसोहळ्यात सेलिब्रेशनदरम्यान हवेत केलेल्या गोळीबारात नवऱ्यामुलाचा मृत्यू झाल्याची घटना सीतापूरमध्ये ही घडलीये. 

Updated: Feb 18, 2016, 01:01 PM IST
लग्नात सेलिब्रेशनदरम्यान हवेत गोळीबार, नवरदेवाचा मृत्यू title=

सीतापूर : लग्नसोहळ्यात सेलिब्रेशनदरम्यान हवेत केलेल्या गोळीबारात नवऱ्यामुलाचा मृत्यू झाल्याची घटना सीतापूरमध्ये ही घडलीये. ज्यावेळी नवरामुलगा घोडीवर बसला होता तेव्हा त्याच्या डोक्याला गोळी लागून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येतय. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु करण्यात आलाय. 

ही घटना कोतवालीमध्ये प्रेमनगर या भागात घडली. येथील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या अमित रस्तोगीचा विवाह सोनम हिच्याशी होणार होता. लग्नासाठी वरात मंडपस्थळी आली. वरातीत नाचगाणी सुरु होती. यावेळी आनंदाच्या भरात हवेत गोळीबार करण्यात आला. मात्र आनंदाच्या भरात केलेले हे कृत्य नवऱ्यामुलाच्या जीवावर बेतलं. त्याच्या डोक्याला गोळी लागली आणि तो घोडीवरुन कोसळला. 

त्यानंतर तातडीने नवऱ्यामुलाला जिल्हा रुग्णालयात उपाचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथून त्याला ट्रामा सेंटरमध्ये भर्ती करण्यास डॉक्टरांनी सांगितले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने दोन्ही कुटुंबातील सदस्यांना जबर धक्का बसलाय.