खुशखबर, मोदी सरकार देणार स्वप्नातील परवडणारी घरं फक्त ५ लाखांत - गडकरी

 केंद्रातील मोदी सरकार लोकांना पाच लाखांहून स्वस्त किंमतीची घरे

PTI | Updated: Feb 10, 2016, 08:52 PM IST
खुशखबर, मोदी सरकार देणार स्वप्नातील परवडणारी घरं फक्त ५ लाखांत -  गडकरी title=

 नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार लोकांना पाच लाखांहून स्वस्त किंमतीची घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी दिली आहे. 
 
 देशातील केवळ एक टक्का नागरिकच १० लाख रूपये किंमतीचे घर खरेदी करण्यास सक्षम आहेत. हे लक्षात घेत, स्मार्ट सिटी उभारण्याबरोबर केंद्र सरकार ५ लाख रूपयांहून स्वस्त किंमतीची घरे उपलब्ध करून देणार आहे, असे गडकरी म्हणाले.

 

'असोचेम'च्या 'स्मार्ट सिटी' संमेलनाला संबोधित करताना गडकरी केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत माहिती देत होते. गडकरी पुढे म्हणाले, " स्वस्त घरे अतिशय महत्त्वाची आहेत. आपल्या देशात केवळ एकच टक्का लोक दहा लाखाहून अधिक किंमत असलेले घर खरेदी करू शकतात, हीच सर्वात मोठी अडचण आहे. जर आपण ५ लाखांहून कमी किंमत असलेली घरे उपलब्ध करून दिली, तर देशातील तब्बल ३० टक्के लोक ही घरे खरेदी करू शकतील." 

स्मार्ट सिटी उभारण्यावर लक्ष केंद्रीत करत असतानाच गरीबांसाठी कमी किंमतीची घरे उपलब्ध करणे ही सुद्धा मोदी सरकारच्या मुख्य अजेंड्यातील एक योजना असल्याचेही गडकरी म्हणाले. या अंतर्गत नागपूरमध्ये असा प्रयोग केला गेला असून, तिथे ७० टक्के 'फ्लाय अँश'चा वापर असलेली इस्पातच्या रचनेवर आधारित घरे बनवण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. या नव्या योजनेचे उद्घाटन २० फेब्रुवारीला होणार असल्याचेही ते म्हणाले. 

या घरांसाठी १००० रूपये प्रति वर्ग फूट इतका खर्च येत असून त्यानुसार ४५० वर्ग फूटाचे घर ५ लाख रूपयांमध्ये देणे आम्हाला शक्य आहे असेही गडकरी पुढे म्हणाले. या घरांमध्ये आम्ही सौरऊर्जा पद्धत वापरणार असून 'फ्लाय अँश'पासून तयार करण्यात येणारा बेडसुद्धा देत आहोत अशीही माहिती गडकरींनी दिली. शिवाय केंद्र सरकार यावर १ लाख ५ हजार रूपयांची सबसिडीसुद्धा देत असल्याचेही ते म्हणाले. घर विकत घेऊ पाहणाऱ्याला या घरासाठी ३ लाख ५ हजार रूपये मोजावे लागणार असून अशा खरेदीवर ७ ते ७.५ टक्के इतक्या व्याजदराने कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे अशी माहि्तीही त्यांनी दिली.