नवी दिल्ली : मुलींना ओझं समजणाऱ्या आई-वडिलांसाठी आपल्या पोटच्या जीवाला सांभाळण्यासाठी कदाचित हे कारण पुरेसं ठरू शकतं... आता देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावावर ११ हजार रुपयांचं फिक्स्ड डिपॉझिट असणार आहे.
देशातील हेल्थकेअर नेटवर्क 'ऑक्सी'नं ही घोषणा केलीय. रिओ ऑलिम्पिकमध्ये देशातील महिला खेळाडूंनी भारताची वाढवलेली शान आणि मानानं प्रेरित होऊन कंपनीनं हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतंय.
देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावावर कंपनीतर्फे सेव्हिंग अकाऊंट उघडण्यात येणार आहे. या अकाऊंटमध्ये प्रत्येक मुलीच्या नावावर ११ हजार रुपयांचां फिक्स्ड डिपॉझिट करण्यात येईल. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ती हे पैसे काढू शकेल.... 'ऑक्सी'ची ही योजना पूर्णत: मोफत आहे, अशी माहिती कंपनीचे संचालक पंकज गुप्ता यांनी दिलीय.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांना आपलं नाव रजिस्टर करावं लागणार आहे. त्यानंतर 'गर्ल डेव्हलपमेंट प्रोग्राम' अंतर्गत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.