नवी दिल्ली: आयडिया सेल्यूलरनं आपल्या सर्व 15 लाख प्रीपेड ग्राहकांना प्रति सेकंद दुसऱ्या प्लाननुसार दिलाय. म्हणजे त्यांना फक्त त्याच वेळेचे पैसे भरावे लागतील, जितका वेळ ते नेटवर्कचा वापर करतील. सध्या ग्राहक प्रति मिनीटानुसार पैसे देतात.
कंपनीचं म्हणणं आहे की, 15 लाख प्रीपेड ग्राहकांना पुढील 30 दिवसांमध्ये प्रति सेकंद प्लानचा फायदा मिळेल. तर इतर ग्राहक या योजनेचा वापर करत आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की, त्यांच्या एकूण 16.6 कोटी ग्राहकांपैकी 15.7 कोटी प्रीपेड ग्राहक आहे. विशेष म्हणजे भारती एअरटेलनं सुद्धा याच आठवड्यात आपल्या सर्व प्रीपेड ग्राहकांना प्रति सेकंद योजनेशी जोडण्याची घोषणा केलीय.
आणखी वाचा - एअरटेल ग्राहकांना सेकंदाप्रमाणे बील देणार
मोबाईल कंपन्या हे पाऊल अशावेळी उचलत आहेत. जेव्हा दूरसंचार विभाग कॉल ड्रॉपच्या समस्येचा तपास करत आहे. आयडियाचं म्हणणं आहे की, त्यांनी 2014-15मध्ये 4050 कोटी रुपये (स्पेक्ट्रम शिवाय) खर्च केलेत. तर आर्थिक वर्ष 2016 साठी भांडवली खर्च योजना वाढवत 6000-6500 कोटी रुपये केलीय.
आणखी वाचा - मोबाईल अॅप, SMS,मिस्ड कॉलद्वारे पीएफ खातं आणि पेंशनची माहिती
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.