मुंबई : केंद्र सरकारच्या कर्मचा-यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी जुलै महिन्यापासून लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन जुलैत केंद्राच्या कर्मचा-यांची दिवाळी साजरी होण्याची चिन्ह आहे.
सातव्या वेतन आयोगासाठी तब्बल 70 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचा लाभ 48 लाख कर्मचा-यांना आणि 52 लाख निवृत्त वेतन धारकांना होणार आहे.
सातवा वेतन आयोग लवकरात लवकर लागू व्हावा यासाठी अनेक दिवसांपासून कर्मचारी संघटना मागणी करत आहेत. त्यामुळे आता सातवा वेतन आयोग लवकरात लवकर लागू होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.