हरिद्वार : अर्ध कुंभ मेळ्याला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. सर्वात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय आहे तो गोल्डन बाबा. ३ कोटींचं सोन अंगावर घालणाऱ्या या गोल्डन बाबांना पाहण्यासाठी घाटावार भाविकांची झुंबड उडतेय.
सुधीर कुमार मक्कड उर्फ गोल्डन बाबा भक्तगणांसह शुक्रवारी गंगा नदीत स्नान करण्यासाठी उतरले आणि त्यांना पाहून अनेकांचे डोळेच दिपले. या बाबांच्या अंगावर तब्बल १५. ५ किलोचे सोन्याचे दागिने आहे. या सोन्याची किंमत सुमारे ३ कोटी रुपये आहे. त्यांच्या हातात सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात सोन्याचं लॉकेट असून त्यांनी तब्बल २७ लाखांचे एक हिऱ्याचे घड्याळही घातले आहे.
'जसं सोनं अतिशय मौल्यवान असतं, तसेच आमचे बाबाही आमच्यासाठी अमूल्य आहेत', असे सांगत बाबांचे भक्तगण त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचे एकप्रकारे समर्थन करतात.
सुधीर कुमार मक्कड (वय ५३), हे मूळचे दिल्लीचे, यांचा कपड्यांचा व्यवसाय होता. मात्र त्यांनी संन्यास घेतला आणि साधू बनले. ' मी आयुष्यात अनेक चुका केल्या, व्यावसायिक म्हणूनही मी चुकलो. मात्र तीच पापं धुण्यासाठी मी हे पाऊल उचलले आहे.