सणासुदीच्या काळात सोनं-चांदीच्या दरात घसरण

प्रत्येक वेळी दिवाळी आणि सणांच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होते. मात्र यावेळी सराफा बाजारात किमती घरसल्या आहेत.

Updated: Nov 3, 2015, 09:11 AM IST
सणासुदीच्या काळात सोनं-चांदीच्या दरात घसरण title=

नवी दिल्ली: प्रत्येक वेळी दिवाळी आणि सणांच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होते. मात्र यावेळी सराफा बाजारात किमती घरसल्या आहेत.

दागिने विक्रेत्यांची कमी मागणी आणि जागतिक बाजारात घसरण झाल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे दर १० रुपयांच्या घसरणीसह २६,८१० रुपये प्रति १० ग्रामवर आले. तर चांदी २७० रुपयांनी कमी होत ३६,५०० रुपये प्रति किलोवर आली.

आणखी वाचा - सोनं घसरलं... चांदीही पडली!

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत फेडरल रिझर्व्हद्वारे डिसेंबरपासून व्याजदरात वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा जागतिक बाजारात आहे. त्यामुळं गेल्या चार आठवड्यांपासून सोन्याचे दर घसरत आहेत. गुंतवणुकीच्या दृष्टीनं सोन्या-चांदीची मागणी कमी झालीय.

सिंगापूरमध्ये सोनं ०.७ टक्क्यांनी कमी होत १,१३४.३९ डॉलर प्रति औंसच्या दरावर आलं. ५ ऑक्टोबरनंतर ही त्याची सर्वात कमी आकडेवारी होती. याशिवाय दागिने आणि किरकोळ व्यापाऱ्यांच्या कमी झालेल्या मागणीचा परिणाम बहुमूल्य धातूंच्या किमतीवर पडतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.