सोन्याची किंमत २४ हजारांवर दाखल...

सोन्याचा पडलेले दर आणखीनच घसरत जाताना दिसत आहेत. आजही सोन्याच्या दरात घसरण होऊन २४,६७३ प्रती दहा ग्रॅमवर स्थिरावलेत. 

Updated: Jul 22, 2015, 03:20 PM IST
सोन्याची किंमत २४ हजारांवर दाखल...  title=

जयपूर : सोन्याचा पडलेले दर आणखीनच घसरत जाताना दिसत आहेत. आजही सोन्याच्या दरात घसरण होऊन २४,६७३ प्रती दहा ग्रॅमवर स्थिरावलेत. 

बुधवारीही बाजारात सोन्याचे भाव १०० रुपयांनी घसरतच उघडले. स्टँडर्ड सोन्याचे दर २५,१०० प्रति दहा ग्रॅमवर उघडलं. तर दागिन्यांचं सोनं जवळपास २४ हजार रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचलंय. सोन्याचे भाव मंगळवारी रात्री २५,२०० रुपयांवर बंद झाले होते. 

उल्लेखनीय म्हणजे, सोन्याच्या भावांत एका मागच्या आठवड्यात जवळपास एक हजार रुपये प्रति दहा ग्रॅमहून जास्त घसरण पाहायला मिळालीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.