सोने-चांदी यांच्या दरात झाली घसरण, पाहा काय आहे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी असल्याने  आणि मागणीत घट झाल्याने सोने-चांदी यांच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. दिल्लीत सोने बाजारात सलग तीन दिवसांच्या मजबुतीनंतर ८५ रुपयांनी सोने दरात घसरण झाली. तर चांदीच्या दरात ३५० रुपयांनी घट झाली.

Updated: Jan 29, 2016, 06:53 PM IST
सोने-चांदी यांच्या दरात झाली घसरण, पाहा काय आहे दर title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी असल्याने  आणि मागणीत घट झाल्याने सोने-चांदी यांच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. दिल्लीत सोने बाजारात सलग तीन दिवसांच्या मजबुतीनंतर ८५ रुपयांनी सोने दरात घसरण झाली. तर चांदीच्या दरात ३५० रुपयांनी घट झाली.

दिल्लीच्या बाजारात सोने दर २७,०५० रुपये प्रति तोळा (१० ग्राम) तर चांदीचा दर घसररुन ३४,८५० रुपये किलोला होता. लंडनमधील माहितीनुसार सोने प्रतिऔंस १.४ डॉलरवरून १११२.६० डॉलर खाली आली. तसेच सोने आकर्षण कमी अर्थात मागणी घट झाली आहे. जानेवारीत ५ टक्के दर मजबुत झाला होता. मात्र, त्यानंतर सोनेदरात घट पाहायला मिळत आहे.

गेल्या आठवड्यात बाजार तीन महिन्यांत चढा दिसून आला. ११२७.८० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला. अमेरिका सोने बाजारात २.३ डॉलर घटून १११३.८० डॉलर प्रति औंस झाला.

जागतिक घसरणीमुळे स्थानीक बाजारात मागणी घटली आहे. त्यामुळे सोने प्रति तोळा ८५ रुपयांनी घसरले.

दिल्ली बाजारातील सोने दर

गोल्ड स्टँडर्ड (दहा प्रती ग्रॅम) ---------- २७०५०
गोल्ड Bitur (दहा प्रती ग्रॅम)  ----------२६९००
चांदी हाजिर (प्रति किलो)  ---------- ३४८५०
चांदी वायदा (किलो) ---------- ३४७२५
नाणे खरेदी (शंभर टक्के)  ---------- ५०००० 
नाणे विक्री (शंभर टक्के)  ---------- ५१०००
गिनी (आठ ग्रॅम प्रति)  ---------- २२५००