सोनं आणि चांदीचा भाव घसरला

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं आणि चांदीचा भाव घसरला आहे. बुधवारी यामुळे दिल्लीच्या सर्राफा बाजारात सोनं १७५ रुपयांनी घसरलं. एका आठवड्यात सोन्याचा भाव हा सगळ्यात खाली गेला आहे. सोन्याचा भाव २९,५५० प्रति तोळावर येऊन पोहोचलं आहे.

Updated: Jan 27, 2017, 01:04 PM IST
सोनं आणि चांदीचा भाव घसरला title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं आणि चांदीचा भाव घसरला आहे. बुधवारी यामुळे दिल्लीच्या सर्राफा बाजारात सोनं १७५ रुपयांनी घसरलं. एका आठवड्यात सोन्याचा भाव हा सगळ्यात खाली गेला आहे. सोन्याचा भाव २९,५५० प्रति तोळावर येऊन पोहोचलं आहे.

चांदीच्या दरातही घट झाली आहे. ३४० रुपयांची घट चांदीमध्ये झाली. चांदी ४१,५०० किलोवर येऊन पोहोचली आहे. परदेशातही सोन्या-चांदीचे भाव घसरले. तज्ज्ञांच्या मते चीनमध्ये मागणी कमी झाल्याने भाव घसरले. आणखी सोनं कमी होणार असल्याचं त्यांचं मत आहे.

चीनच्या नववर्षात सुरुवातील लोकांनी खरेदी करणं टाळलं. त्यामुळे सोन्याच्या किंमती कमी झाल्या. चांदीच्या दरातही ही घट पाहायला मिळाली.