`गृह आधार योजने`ची गोवेकरांना छाया!

ज्या कुटुंबांच वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांतल्या महिलांना प्रत्येक महिन्याला हजार रुपयांचं अनुदान गोवा सरकारकडून देण्यात येणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 3, 2012, 11:51 AM IST

www.24taas.com, गोवा
महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या नागरिकांसाठी गोवा सरकारनं एक कल्याणकारी निर्णय घेतलाय. ज्या कुटुंबांच वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांतल्या महिलांना प्रत्येक महिन्याला हजार रुपयांचं अनुदान गोवा सरकारकडून देण्यात येणार आहे.
`गृह आधार योजना` असं या योजनेचं नाव आहे. विवाहित, विधवा आणि घटस्फोटीत महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या कल्याणकारी योजनेची घोषणा केलीय. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली महागाईचा परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागू नये, यासाठी ही योजना तयार करण्यात आल्याचं पर्रिकर यांनी यावेळी म्हटलंय. या घोषणेमुळं गोवा सरकारच्या तिजोरीवर १८० कोटींचा बोजा पडणार आहे.