मुख्यमंत्र्यांविरोधात फेसबुकवर प्रतिक्रिया, लेखकाला अटक

आयएएस आधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्या निलंबन प्रकरणी प्रतिक्रीया व्यक्त करणाऱ्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध दलित लेखक कंवल भारती यांना अटक केली आहे. अटक केल्यावर काही वेळातच त्यांना जामीनावर सोडण्यात आले.

Updated: Aug 9, 2013, 05:14 PM IST

www.24taas.com झी मीडिया, लखनऊ
आयएएस आधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्या निलंबन प्रकरणी प्रतिक्रीया व्यक्त करणाऱ्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध दलित लेखक कंवल भारती यांना अटक केली आहे. अटक केल्यावर काही वेळातच त्यांना जामीनावर सोडण्यात आले.
कंवल भारती यांना यूपी पोलीसांनी मंगळवारी रामपूर येथून अटक केली होती. त्यांनी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर असे लिहिले की, “आरक्षण आणि दुर्गा शक्ती नागपाल या दोन्ही मुद्दांमुळे अखिलेश यादव यांचे समाजवादी सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरत आहे. यूपीचे अखिलेश, शिवपाल यादव, आजम खान आणि मुलायम सिंह हे चार नेते या मुद्द्यावर कितीही काहीही बोलत असले तरी ते जनतेपासून पूर्णपणे वेगळे झाले आहेत. त्यांना हे दिसत नाही की, जनतेमध्ये त्यांची छी-थू होत आहे. लोककार्यांसाठी जनता यांना नकार देत आहे. अपराध करणाऱ्यांचा आत्मविश्वास पक्काच असेल आणि बेफिकीर मंत्री माणुसकी विसरून राक्षस बनले असतील तर सत्तेच्या मोहात आंधळे झालेल्या लोकांना समजवायचं म्हणजे म्हशी पुढे पुंगी वाजवल्यासारखे आहे”
दलित लेखक कंवल भारती यांना अटक झाल्यांची बातमी फेसबूकवर येतांच लगेचच अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देणं सुरू केलं. अधिक लोकांनी यूपी सरकारवर टीका केली. कंवल भारती यांच्या फेसबूक स्टेटसला शेकडो लोकांनी शेयर केल होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.