सेनेच्या विरोधानंतर 'आप'नं दिलं गुलाम अली यांना आमंत्रण

शिवसेनेच्या विरोधानंतर आता पाकिस्तानी गायक गुलाम अली यांना अरविंद केजरीवाल सरकारनं राजधानी दिल्लीत येण्याचं आमंत्रण दिलंय. 

Updated: Oct 8, 2015, 12:10 PM IST
सेनेच्या विरोधानंतर 'आप'नं दिलं गुलाम अली यांना आमंत्रण title=

नवी दिल्ली : शिवसेनेच्या विरोधानंतर आता पाकिस्तानी गायक गुलाम अली यांना अरविंद केजरीवाल सरकारनं राजधानी दिल्लीत येण्याचं आमंत्रण दिलंय. 

'संगीताची कोणतीही सीमारेषा नसते...' असं शिवसेनेला सुनावत दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा यांनी पाकिस्तानी गायकांचं स्वागत केलंय. गुलाम अली यांनी भारताची राजधानी दिल्ली इथं येऊन प्रस्तुती द्यावी असं त्यांनी म्हटलंय. 

'गुलाम अली यांना मुंबईत परवानगी मिळाली नाही हे खूप दु:खद आहे. मी त्यांनी दिल्ली येण्याचं आणि कार्यक्रम सादर करण्याचं आमंत्रण देतोय. संगीताची कोणतीही सीमारेषा नसते' असं त्यांनी म्हटलंय. 

शिवसेनेच्या धमकीनंतर गुलाम अली यांची मुंबईतील नियोजित कॉन्सर्ट रद्द करण्यात आली होती. सीमेपलिकडून जेव्हापर्यंत दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला शहरात कार्यक्रम करू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.