मैत्रिणींनीच बनवला बलात्काराचा व्हिडीओ

उत्तर प्रदेशातील बरैलीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. आपल्याच मैत्रिणीवर बलात्कार होत असताना तिच्या मैत्रिणींनी तिला मदत करायचे सोडून त्या व्हिडीओ बनवत राहिल्या. 

Updated: Dec 27, 2015, 02:13 PM IST
मैत्रिणींनीच बनवला बलात्काराचा व्हिडीओ  title=

बरैली : उत्तर प्रदेशातील बरैलीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. आपल्याच मैत्रिणीवर बलात्कार होत असताना तिच्या मैत्रिणींनी तिला मदत करायचे सोडून त्या व्हिडीओ बनवत राहिल्या. जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा हा प्रकार समोर आला. 

शेरगड येथील बैरमनगर भागात ही पिडीता राहते. गावातील एका युवकाने तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा हे कृत्य होत होते तेव्हा तिच्या मैत्रिणीही तिच्यासोबत होत्या. मात्र तिला मदत करायचे सोडून त्या व्हिडीओ बनवत राहिल्या. 

याप्रकरणी पिडीत मुलीच्या त्या दोन्ही मैत्रिणींना अटक कऱण्यात आली असून या प्रकरणातील आरोपी फरार आहे.