www.24taas.com, झी मीडिया, रांची
सीबीआयचं विशेष कोर्ट लालू प्रसाद यादव यांना दिलासा देईल अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. मात्र आता ती मावळलीय. कारण कोर्टानं त्यांना दोषी ठरवलंय. त्यामुळं सेलिब्रेशनसाठी आणलेले फटाके तसेच राहिलेत.
चारा घोटाळाप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांना कोर्टानं दोषी ठरवलंय. रांचीमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयानं आज हा महत्वपूर्ण निर्णय दिलाय.
न्यायालय आता ३ ऑक्टोबरला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारं शिक्षा सुनावणार आहे. उद्या शिक्षेवर युक्तीवाद केला जाणार आहे. लालूंना ३ ते ५ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. ते आता कोर्टाच्या ताब्यात आहेत. माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह सर्व ४५ आरोपींवर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.