पत्नीशी जबरदस्तीनं संभोग हा `बलात्कार` नाही!

कायदेशीररित्या विवाहीत पत्नीशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करणं हा गुन्हा नसल्याचं, दिल्लीच्या एका कोर्टानं म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 4, 2012, 04:19 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
कायदेशीररित्या विवाहीत पत्नीशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करणं हा गुन्हा नसल्याचं, दिल्लीच्या एका कोर्टानं म्हटलंय. याच आधारे पत्नीवर बलात्कार करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एका व्यक्तीला या आरोपातून मुक्त करण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत.
आपल्या जोडीदाराबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करणं, भलेही ते जबरदस्तीनं केले असतील तरीही हा वैवाहिक बलात्कार ठरू शकत नाही, असं या कोर्टानं म्हटलंय. जिल्हा न्यायाधीश जे. आर. आर्यन यांनी हे आदेश दिलेत. कायद्यानुसार वैवाहिक बलात्कार नावाची कोणती संकल्पनाच अस्तित्वात नसल्याचं मान्य करत त्यांनी हाजी अहमद सईद याला आरोपमुक्त केलंय.
बचावपक्षाच्या वकिलांची बाजू घेत, आरोपकर्ती महिलेनं आरोपीसोबत कायदेशीररित्या विवाहित असेल आणि या दरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले (जरी हे संबंध जबरदस्तीनं लादले गेले असतील) तर तो बलात्कार ठरणार नाही, असं कोर्टानं म्हटलंय.