एका संशयित दहशतवाद्यासह ५ जण पोलीस चकमकीत ठार

तेलंगणमध्येही पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच कैद्यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. मृतांमध्ये सिमी संघटनेच्या सक्रीय सदस्याचाही समावेश आहे. 

IANS | Updated: Apr 7, 2015, 03:07 PM IST
एका संशयित दहशतवाद्यासह ५ जण पोलीस चकमकीत ठार title=

हैदराबाद: तेलंगणमध्येही पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच कैद्यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. मृतांमध्ये सिमी संघटनेच्या सक्रीय सदस्याचाही समावेश आहे. 

तेलंगणमध्येही आज सकाळी पोलीस चकमकीत पाच कैद्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी वारांगल जिल्ह्यातील पाच कैद्यांना सुनावणीसाठी न्यायालयात नेलं जात होतं. या दरम्यान कैद्यांनी पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. 

कैद्यांचा पाठलाग करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि यात पाचही कैद्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सिमीचा सक्रीय सदस्य विकरुद्दीन अहमदचाही समावेश आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.