भुवनेश्वरच्या एसयूएम हॉस्पीटलमध्ये भीषण आग, 15 जणांचा मृत्यू

भुवनेश्वरच्या एसयूएम हॉस्पीटलला भीषण आग लागली आहे.

Updated: Oct 17, 2016, 10:53 PM IST
भुवनेश्वरच्या एसयूएम हॉस्पीटलमध्ये भीषण आग, 15 जणांचा मृत्यू title=

भुवनेश्वर : भुवनेश्वरच्या एसयूएम हॉस्पीटलला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 60 जण जखमी झाली आहेत. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. संध्याकाळी 7.30 वाजता ही आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यावर अग्नीशमन दलाला यश आलं आहे.