नवी दिल्ली: मोठ्या आनंदात आणि उत्साहात वाजत-गाजत नवऱ्याचं वऱ्हाड नवरीच्या घरी पोहचलं. मात्र त्या आनंदी वातावरणात असं काही झालं की वऱ्हाडाला नवरीविना मागे फिरावं लागलं. कारण अती उत्साहात सासरेबुवांनी चक्क एका मुलीचं चुंबन घेतलं.
सासरेबुवांचं हे कृत्य मुलीला पचनी पडलं नाही आणि तिने थेट लग्न करण्यास नकार दिला. ही घटना फारुखाबादमधील नागला खैरबंदमध्ये घडली. परमेश्वरी दयाल यांची मुलगी रुची हीचं लग्न जैतहरा गावच्या राजेश नामक मुलाशी ठरलं होतं.
लग्नात सर्व काही ठीक सुरू होतं. मात्र शुभमंगल..सावधान होण्यापूर्वीच नवरीने लग्न मोडले. कारण सगळी मंडळी लग्नाच्या गडबडीत असताना सासरेबुवांनी लाजलज्जा न बाळगता नवरीशेजारी उभ्या असलेल्या मुलीचे चुंबन घेतले. ही मुलगी नवरीची चुलत बहीण निघाली आणि तिथेच सगळे बिघडलं.
नवरी मुलीला ही सगळी गोष्ट कळल्यावर तिने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.