ग्रेटर नोएडा : मुस्लिम स्कूलमध्ये कट्टरपंथियांनी ध्वज फडकविण्यास केला विरोध

ग्रेटर नोएडामधील दानकौर परिसरातील सैय्यद भूरेशाह गर्ल्स स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकविण्यास काही कंटरपंथियांनी गोंधळ घालत विरोध केला.

Updated: Jan 26, 2016, 06:25 PM IST
ग्रेटर नोएडा : मुस्लिम स्कूलमध्ये कट्टरपंथियांनी ध्वज फडकविण्यास केला विरोध title=

लखनऊ : ग्रेटर नोएडामधील दानकौर परिसरातील सैय्यद भूरेशाह गर्ल्स स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकविण्यास काही कंटरपंथियांनी गोंधळ घालत विरोध केला.

स्कूलमध्ये सकाळी ध्वज फडकविण्यासाठी तयारी केली होती. यावेळी येथे काही कंट्टरपंथिय आलेत. त्यांनी ध्वजवंदनाची तयारी करणाऱ्यांना धमकावले. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. त्यावेळी कट्टरपंथियांनी त्यांनाही विरोध केला. असे वृत्त 'पत्रिका'ने प्रसिद्ध केलेय.

ही शाळा युपीतील अल्पसंख्यांक वेलफेअर विभागाच्यांतर्गत आहे. सोमवारीच काही लोकांनी धमकी दिली होती. शाळेत ध्वज वंदन कार्यक्रम घ्यायचा नाही. पोलिसांना याची माहिती देल्यानंतर पोलिसांनी कोणीही कायदा हातत  घेण्याचा प्रयत्न करु नका, असे बजावले. 

तरीही कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न  झाला. त्यामुळे शिक्षक वर्गात भितीचे वातावरण आहे. काहींनी शाळा सोडून दिलेय. याबाबत उत्तर प्रदेश सरकारला याची कल्पना दिलेय. मात्र, दबाब कायम आहे, असे सांगण्यात आले.