भारतीय सेनेतील अधिकाऱ्याची मुलगी इसीसमध्ये जाण्याचा प्लान बनवते तेव्हा

इसीस या दहशतवादी संघटनेची दहशत सर्वांनाच माहित आहे. इसीसच्या क्रूरतेने अख्खं जग हादरलंय. मी़डियात आलेल्या रिपोर्टनुसार, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये दिल्ली युनिवर्सिटीची एक माजी विद्यार्थी सामिल होण्यासाठी इच्छूक होती. 

Updated: Sep 21, 2015, 12:58 PM IST
भारतीय सेनेतील अधिकाऱ्याची मुलगी इसीसमध्ये जाण्याचा प्लान बनवते तेव्हा title=

नवी दिल्ली : इसीस या दहशतवादी संघटनेची दहशत सर्वांनाच माहित आहे. इसीसच्या क्रूरतेने अख्खं जग हादरलंय. मी़डियात आलेल्या रिपोर्टनुसार, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये दिल्ली युनिवर्सिटीची एक माजी विद्यार्थी सामिल होण्यासाठी इच्छूक होती. 

मुलगी हिंदू, वडील भारतीय सेनेत उच्च पदावर
दिल्ली युनिवर्सिटीची ही विद्यार्थीनी हिंदू परिवारातून आहे, विशेष म्हणजे तिचे वडील भारतीय सेनेत अधिकारी होते.

२५ वर्षाच्या मुलीला समजावतायत 'एनआयए'चे अधिकारी
मिळालेल्या माहितीनुसार इंटेलेजन्स ब्युरोचे अधिकारी या मुलीला इस्लामिक संघटनेत सामिल होऊ नकोस म्हणून समजवतायत. मागील काही आठवड्यांपासून हे अधिकारी या मुलीला तेच समाजवत आहेत की, इसीसमध्ये सामिल होणं किती धोकायदायक आहे. ही मुलगी २५ वर्षांची आहे, तिचे वडील भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहेत.

ऑस्ट्रेलियात करण्यात आला ब्रेनवॉश
दिल्ली युनिवर्सिटीत ग्रॅज्युएशन केल्यानंतर ही युवती ऑस्ट्रेलियाला शिक्षणासाठी गेली, मात्र ती जेव्हा परतली तेव्हा तिच्यात मोठे बदल दिसून आले. मात्र युवतीच्या पित्याने जरी ती त्यांची मुलगी असली तरी त्यांनी याबाबतीत एनआयएला याविषयी माहिती दिली होती. 

या पित्याने त्या मुलीमध्ये भरण्यात आलेली कट्टरता दूर करण्यासाठी, तिचं समूपदेशन करण्यासाठी एनआयएची मदत मागितली होती. एनआयए आणि आयबी या प्रकरणी एकमेकांच्या संपर्कात आहेत.

पित्याला सांगावी लागली ही धक्कादायक माहिती
आयबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. या मुलीच्या वडिलांनी काही दिवसापूर्वी तिच्या कम्प्युटरवर इसीसशी संबंधित काही माहिती पाहिली होती.

सिरीयाला जाण्याचा प्लान

या मुलीच्या वडिलांनी याबाबतीत आणखी खोलात जाऊन पाहिलं तर त्यांना लक्षात आलं की, इसीसमध्ये भरती करणाऱ्या लोकांच्या संपर्कात ही युवती होती. एवढंच नाही तर या युवतीने आयएसमध्ये सामिल होण्यासाठी सीरीयाला जाण्याचा प्लानही केला होता.

आपल्या मुलीचा हा ब्रेनवॉश केलेला पाहून त्यांच्या पाया खालची जमीन सरकली त्यांनी, तात्काळ एनआयएकडे मदत मागितली. सुत्रांच्या माहितीनुसार हिंदू युवतीने इस्लाम कबूल करण्याचा प्लान करून ऑस्ट्रेलिया मार्गे सीरिया जाण्याचा प्लान केला असावा. आता एनआयए या विद्यार्थींनीला आधीच्या स्थितीत परत आणण्याचा प्रयत्न करत आहे.

इसीसमध्ये महिलांचं लैंगिक शोषण, महिला सेक्स गुलाम
इसीसमध्ये महिलांचं मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण होत आहे, अशा घटना काही दिवसांपूर्वी समोर आल्या आहेत, याआधी इसीस ही धाडसी संघटना असल्याचा गैरसमज भारतीय युवकांमध्ये झाला होता, मात्र प्रत्यक्षात इसीसमध्ये गेल्यानंतर तेथील नरक यातना पाहिल्यानंतर आयुष्याचे सोनेरी क्षण वाया घालवल्याचा पश्चाताप तरूण-तरूणींकडे असतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.