कानपूर रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना मदतीची घोषणा

मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा

Updated: Nov 20, 2016, 01:45 PM IST
कानपूर रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना मदतीची घोषणा title=

कानपूर : पुखरैया येथे पटना-इंदौर एक्सप्रेस ट्रेनला झालेल्या अपघातात १४ डब्बे घसरल्याने ९१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गंभीरपणे जखमींना ५० हजार रुपये तर मृतांच्या नातेवाईकांना ३.५ लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने देखील मदत जाहीर केली आहे. पटना-इंदूर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत तर गंभीर जखमींना ५० हजार आणि किरकोळ जखमींना २५ हजारांची मदत जाहीर केली आहे. तर मध्य प्रदेश सरकारने देखील मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ट्रेन ही इंदौर वरुन पटनाला जात होती. दुर्घटना सकाळी ३.१० वाजता घडली. झांसी आणि कानपूर येथून वैद्यकीय पथक तेथे पोहोचले आहे. S1, S2 या दोन डब्यांचं अधिक नुकसान झालं आहे. या दुर्घटनेनंतर अनेक गांड्याचे मार्ग बदलण्यात आले आहेत.