गूगल, फेसबुक, ट्विटर वापरणाऱ्यांवर उद्यापासून लागणार 'गूगल टॅक्स'

अर्थ मंत्रालयानं उद्यापासून गूगल टॅक्स लागू होणार असल्याचं घोषित केलंय. 

Updated: May 31, 2016, 08:02 PM IST
गूगल, फेसबुक, ट्विटर वापरणाऱ्यांवर उद्यापासून लागणार 'गूगल टॅक्स' title=

मुंबई : अर्थ मंत्रालयानं उद्यापासून गूगल टॅक्स लागू होणार असल्याचं घोषित केलंय. 

अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे 'गूगल टॅक्स' अर्थात इक्वलायजेशन लेवी १ जून २०१६ पासून लागू होणार आहे. यानुसार, देशातील व्यापाऱ्यांवर परदेशी ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजेच गूगल, याहू, ट्विटर, फेसबुक इत्यादी वेबसाईटवर ऑनलाईन जाहिरातीसाठी दिलेल्या राशीवर ६ टक्के लेवी वसूल केली जाणार आहे.  

वित्तीय वर्षांत एक लाखांच्यावर पेमेंटची राशी असेल तर ही लेवी लागू होईल... आणि महत्त्वाचं म्हणजे, ही लेवी केवळ बिजनेस टू बिझनेस म्हणजेच बी२बी ट्रान्झक्शनवरच लागू होईल. 

'लेवी'पासून पळ काढण्याचे मार्ग... 

परदेशी सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे भारतात स्थायी बिझनेस संस्थान असतील आणि बिल भारतातील कंपन्यांमधून बनत असेल तर या पेमेंटवर इक्वलायजेशन लेवी लागू होणार नाही. 

इक्वलायजेशन लेवी गूगल, याहू, फेसबुक, ट्विटर आणि परदेशी कंपन्यांच्या बॉटम लाईनला प्रभावित करू शकतो. यापासून वाचण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे भारतात आपल्या व्यापारी सहकाऱ्यांच्या मदतीनं डील करणं...