भुजबळांच्या मालमत्तेवर ईडीची पुन्हा छापेमारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासमोरील अडचणी संपण्याची काही चिन्हेच दिसत नाहीयेत. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर ईडीनं पुन्हा छापे घातले आहेत. 

Updated: Feb 1, 2016, 04:16 PM IST
भुजबळांच्या मालमत्तेवर ईडीची पुन्हा छापेमारी title=

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासमोरील अडचणी संपण्याची काही चिन्हेच दिसत नाहीयेत. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर ईडीनं पुन्हा छापे घातले आहेत. 

भुजबळांच्या घर आणि कार्यालयांसह नऊ ठिकाणी छापे घातले आहेत अशी माहिती भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिलीय. भुजबळांना अटक अटळ असल्याचंही सोमय्यांनी सांगितलंय. 

समीर आणि पंकज भुजबळ यांनी कोणत्या जेलमध्ये जावं ते त्यांनी ठरवावं असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. दोन दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचलनालयानं छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांना नोटीस बजावली होती.