महाकौशल एक्सप्रेसचे ८ डबे घसरले, १२ जखमी

जबलपुरहून दिल्लीला येण्या-या महाकौशल एक्सप्रेसचे 8 डब्बे रुळावरून घसरल्याने अपघात झालाय. या अपघातात १२ प्रवासी जखमी झालेत. 

Updated: Mar 30, 2017, 08:09 AM IST
महाकौशल एक्सप्रेसचे ८ डबे घसरले, १२ जखमी title=

महोबा : जबलपुरहून दिल्लीला येण्या-या महाकौशल एक्सप्रेसचे 8 डब्बे रुळावरून घसरल्याने अपघात झालाय. या अपघातात १२ प्रवासी जखमी झालेत. 

उत्तर प्रदेशातील कुलापहेर जवळील महोबा येथे हा अपघात झालाय. रुळावरून घसरलेल्या काही डब्ब्यात एसी कोचचाही समावेश आहे. मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. 

रुळावरुन घसरलेले डबे हटवण्याचे काम वेगाने सुरु आहे. दरम्यान, या अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.