नवी दिल्ली : भारत म्यानमार सीमेवर भूकंप झालाय. पहाटे 4.35 वाजता हा भूकंप झाला असून भूकंपाची तीव्रता 6.8 रिस्टर स्केल इतकी आहे. या भूकंपामुळे ६ जणांचा मृत्यू तर ५० जण जखमी झालेत.
या भूकंपाचा केंद्र बिंदू इंफाळपासून 35 किमी अंतरावरील तमेंगलांग जिल्ह्यात आहे. भूकंपामुळे इंफाळमधील विद्यूत पूरवठा खंडीत करण्यात आलाय. नेपाळ, प. बगाल, मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेश, झारखंड या ठिकाणीही भूकापाचे धक्के जाणवलेत.
या भूकंपामुळे काही इमारतींचं मोठं नुकसान झाल्याचं पुढे येतय. भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई, आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी फोनवर बातचीत केलीय. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांच्या तुकड्या गुवाहाटीला रवाना करण्यात येत आहेत. शिवाय पंतप्रधानांनी अरुणाचलचे मुख्यमंत्री नबाम टुकी यांच्याशीही फोनवर संपर्क केलाय.