www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली मध्यरात्री भूकंपाचे चार धक्के बसलेत. मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवल्याने भीतीचे वातावरण होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली.
या भूकंपात सुदैवाने यात कोणतंही नुकसानं झालं नाही. भूकंपाच्या भीतीने नागरिक घरामधून बाहेर आले. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसण्यास सुरुवात झाली. दिल्ली आणि आसपासच्या उपनगरांना पहाटे तीन तासांत चार भूकंपाचे धक्के बसले. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट होती.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा धक्का तीन ते चार सेकंद जाणविला. भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण दिल्लीतील सैनिक फार्मस भागात होता. त्यानंतर १.१४ मिनिटांनी३.३ तीव्रतेचा दुसरा धक्का बसला. हा धक्का नोएडा आणि गाझियाबाद भागात जास्त जाणविला. याचा केंद्रबिंदू गुडगाव जवळील मनेसर येथे होता. यानंतरचे दोन धक्के १.५५ मिनिटांनी (२.५ रिश्टर स्केल) आणि ३.४० मिनिटांनी (२.८ रिश्टर स्केल) जाणविले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.