तुमच्या 'पीएफ' अकाऊंटमुळे साकार होऊ शकतं तुमच्या घराचं स्वप्न...

भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जमा करून एखादा सामान्य व्यक्ती आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकतो, अशी चिन्हं आता दिसू लागलीत.

Updated: Jan 21, 2015, 01:13 PM IST
तुमच्या 'पीएफ' अकाऊंटमुळे साकार होऊ शकतं तुमच्या घराचं स्वप्न... title=

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जमा करून एखादा सामान्य व्यक्ती आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकतो, अशी चिन्हं आता दिसू लागलीत.

बँकांकडून भल्या मोठ्या व्याजदरावर कर्ज घेण्याऐवजी एखाद्या कर्मचाऱ्यासाठी आपल्या 'पीएफ'मधून व्याजमुक्त मोठी रक्कम उपलब्ध होण्याची व्यवस्था होऊ शकते, अशी   

केंद्रीय न्यासी बोर्डानं (सीबीटी)) हा प्रस्ताव सरकारसमोर सादर केलाय. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला तर कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा मिळू शकेल. 'ईपीएफओ'नं नुकतंच या दिशेनं पुढे पाऊल टाकण्याचे संकेत. श्रम आणि रोजगार मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत या आठवड्याच्या सुरुवातीला एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरमध्ये ही व्यवस्था अस्तित्वात आहे. याच धर्तीवर आधारीत भारतातही कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफ खात्यातून आपलं घराचं स्वप्न पूर्ण करता येऊ शकता.

काय आहे या प्रस्तावात...
प्रत्येक महिन्याला पीएफमध्ये जमा होणाऱ्या रकमेतून ईएमआयची व्यवस्था केली जाऊ शकते. खात्यातून काढली गेलेली पीएफ रक्कम पुन्हा आपल्या अकाऊंटमध्ये जमा करण्याचा विकल्प खातेदारांना उपलब्ध होईल.

पण, या व्यवस्थेत खातेधारकांना पीएफ जमा केल्यानंतर प्रत्येक महिन्याला मिळणारं व्याज मात्र बंद होईल. पीएफ अकाऊंटमध्ये जमा असलेल्या राशीवर 'ईपीएफओ'कडून निर्धारित केलेल्या विश्वसनीय डेव्हलपरच्या विविध योजनांमध्ये ही रक्कम लावण्याचा पर्यायही उपलब्ध होऊ शकेल.  

सीबीटी आणि सरकारनं जर या प्रस्तावाला मंजुरी दिली तर हे स्वप्न साकार करणं शक्य आहे, असं केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.