नवरदेवाच्या लालचीवृत्तीने लग्न मोडले

सामाजात प्रबोधन करून हुंड्याची पद्धत बंद व्हावी यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आसतात.

Updated: Apr 26, 2014, 03:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,
सामाजात प्रबोधन करून हुंड्याची पद्धत बंद व्हावी यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आसतात. पण काही लोकांची लालचीवृत्ती ही सामाज बिघडण्याच्या प्रयत्नातच नेहमी असते. असाच एक प्रकार बोदवाड तालुक्यात समोर आला. लग्नात, `जोपर्यंत मोटारसायकल व दोन लाख रुपये मला मिळत नाहीत, तोपर्यंत लग्न लावणार नाही`, अशी भूमिका एका नवऱ्याने घेतली.
भगवान तायडे यांच्या मुलीचं लग्न गोकुळ याच्या सोबत ठरलं होतं. लग्नात तायडे यांनी गोकुळला पाच ग्रॅमची अंगठी आणि कपडे दिले. तसेच लग्नाचा खर्च देखील केला. पण लग्नाच्या दिवशी नवरदेवाने मोटर सायकलचा हट्ट धरला.
लग्नाआधीच गोकुळ दारु पियाल्याने शुद्धीत नव्हता. वरात सुरू असताना गोकुळने अचानक घोड्यावरून उडी घेतली आणि घोडामालकाला देखील मारहाण केली. हा सर्व प्रकार पाहून भगवान तायडेंनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलीसांकडे मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चासह अडीच हजार लोकांच्या स्वयंपाकाचा खर्च मिळावा यासाठी भगवान यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात वाद सुरूच होता. वरासह त्यांच्याकडील मंडळींवर कारवाई करावी, अशी मागणी तायडेंनी पोलिसांकडे केली आहे.
या प्रकारानंतर मुलीने स्वत:च लग्न करण्यास नकार दिला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.