आता स्मार्टफोनवर फुकटात बघा दूरदर्शन!

नवी दिल्ली : सरकारी वाहिनी असणाऱ्या दूरदर्शनने देशांतील काही ठिकाणी ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर मोफत लाईव्ह दूरदर्शन सेवा देण्यास सुरुवात केली आहे. दूरदर्शनने सोमवारी काढलेल्या एका परिपत्रकात याविषयी माहिती दिली आहे.

Updated: Apr 5, 2016, 04:54 PM IST
आता स्मार्टफोनवर फुकटात बघा दूरदर्शन! title=

नवी दिल्ली : सरकारी वाहिनी असणाऱ्या दूरदर्शनने देशांतील काही ठिकाणी ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर मोफत लाईव्ह दूरदर्शन सेवा देण्यास सुरुवात केली आहे. दूरदर्शनने सोमवारी काढलेल्या एका परिपत्रकात याविषयी माहिती दिली आहे.

दूरदर्शनच्या 'डिजीटल टेरेस्ट्रियल टेलिव्हिजन' या संस्थेने  या सेवेचा प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात देशातील १६ शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यात मुंबई, कोलकता, चेन्नई, दिल्लीस गुवाहाटी, पटना, रांची, कट्टक, लखनऊ, जालंधर, रायपूर, इंदोर, औरंगाबाद, भोपाळ, बंगळुरू आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे.

पण, ही सेवा मिळवण्यासाठी काही अटींची पूर्तता केली जाणे आवश्यक आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये 'इंटिग्रेटेड डिजीटल टेलिव्हिजन' हे फीचर असणे गरजेचे आहे. पण, सध्या हे फीचर केवळ एलजी, पॅनासॉनिक, सॅमसंग आणि सोनी या कंपन्यांच्या काही स्मार्टफोन्समध्ये आहे.

इतरांना, या सुविधेचा लाभ घ्यायचा असल्यास DVB-T2 हे डोंगल विकत घ्यावे लागेल. त्यानंतर OTG केबलद्वारे हे डोंगल आपल्या मोबाईलला कनेक्ट करुन तुम्हाला ही सुविधा वापरता येईल. त्यासाठी केवळ एक अॅप तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे. मुख्य म्हणजे, इंटरनेट सुरू नसल्यासही ही सेवा वापरणे शक्य होणार आहे.