नवऱ्याला टक्कल पडल्यावरून चिडवलं तर....

पुरूषांमध्ये टक्कल पडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे, मात्र अशा टक्कल पडलेल्या माणसाच्या बायकोने तिच्या नवऱ्याला टकलावरून चिडवलं आणि मग उभं राहिलं एक वेगळंच रामायण.

Updated: Aug 31, 2016, 06:06 PM IST
नवऱ्याला टक्कल पडल्यावरून चिडवलं तर.... title=

म्हैसूर : पुरूषांमध्ये टक्कल पडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे, मात्र अशा टक्कल पडलेल्या माणसाच्या बायकोने तिच्या नवऱ्याला टकलावरून चिडवलं आणि मग उभं राहिलं एक वेगळंच रामायण.

आपल्याच बायकोने आपल्याला टक्कल पडल्यावरून चिडवल्याने नवरा संतापला, त्याने बायकोला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला.
आता ही महिला सध्या एका मंदिराच्या समोर बसून आहे. तसेच या महिलेने याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद देखील दिली आहे.

मात्र पत्नी व्यवस्थित जेवण बनवत नसल्याने आपण तिला घराबाहेर काढले होते, असे तिच्या पतीने म्हटले आहे. मुरलीधर असे या पतीचे नाव असून त्यांचा नुकताच विवाह झाला होता. त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला टक्कलवरुन चिडवल्याने त्याने तिला घराबाहेर काढल्याचा अंदाज आहे. विजयनगर पोलीस ठाण्यात तिने आपल्याला पतीने घराबाहेर काढल्याची फिर्याद दिली आहे.