www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बहुचर्चित दिल्ली गँगरेप प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ‘ज्युवेनाईल जस्टीस बोर्डा’नं दोषी करार दिलंय. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जुलै रोजी होणार आहे.
संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या दिल्ली गँगरेप प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीला आज ‘ज्युवेनाईल जस्टीस बोर्डा’नं कोर्टानं दोषी ठरवलंय. १६ डिसेंबरला चालत्या बसमध्ये तरूणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर देशभर या घटनेचा निषेध करण्यात आला. सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी राम सिंह, अक्षय ठाकूर, मुकेश, पवन, विनय यांच्यासोबतच एका अल्पवयीन आरोपीलाही अटक करण्यात आली होती.
यापूर्वी अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत कोर्टामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, याच कोर्टानं अल्पवयीन मानलेल्या आरोपीनं पीडित मुलीला क्रूरतेनं जखमीही केलं होतं. परंतू, दिल्ली बाल न्यायालयानं आरोपीच्या हाडांच्या तपासणीची मागणी फेटाळून लावत या आरोपीला अल्पवयीन ठरवलं होतं.
याच प्रकरणातील अटकेत असलेल्या इतर पाच आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, हत्या, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, हत्येचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, दरोड्यावेळी हत्या करणे, गुन्हा किंवा चोरी करताना हत्येचा प्रयत्न करणे, पुरावा नष्ट करणे आणि कट रचणे आदी आरोप ठेवण्यात आलेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.