www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
१६ डिसेंबर २०१२ ची रात्र निर्भयासाठी काळरात्रच ठरली... त्या घटनेनंतर जे काही घडलं त्यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट...
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला सुरू असला तरी तब्बल नऊ महिन्यानंतर १६ डिसेंबरचा निकाल लागणार आहे. दिल्ली सामूहिक बलात्कारामुळे देश अक्षरश: हादरुन गेला होता. देशाची राजधानी दिल्लीत तो भयंकर गुन्हा घडला होता. तो गुन्हा अक्ष्यम असाच आहे. देश ती घटना कधीच विसरु शकणार नाही. त्या घटनंतर देशात बरंच काही घडलं...
तारीख : १६ डिसेंबर २०१२
२३ वर्षीय पॅरा मेडिकलच्या विद्यार्थीनीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपींचा विरोध करणाऱ्या निर्भयाला तसेच तिच्या मित्राला त्या सहा नराधमांनी बेदम मारहाण केली. आपला गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी चालत्या बसमधून दोघांनी फेकून दिलं. जखमी झालेली निर्भया आणि तिच्या मित्राला उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तारीख : १७ डिसेंबर २०१२
पोलिसांनी सामूहिक बलात्काराची गुन्ह्याची नोंद केली होती. १७ डिसेंबरला पोलिसांना चौघा आरोपींची माहिती मिळाली. बस चालक राम सिंह, त्याचा भाऊ मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्त हे ते नराधम ज्यांनी ते अघोरी कृत्य केलं होतं. मात्र, तोपर्यंत दोन आरोपींची ओळख पटली नव्हती.
तारीख : १८ डिसेंबर २०१२
पोलिसांनी बस चालक रामसिंह आणि अन्य तिघा जणांना दिल्लीतल्या विविध ठिकाणाहून अटक केली.
तारीख : २० डिसेंबर २०१२
पोलिसांनी अटक आरोपींची ओळख परेड घेतली. निर्भयाच्या मित्राने आरोपींना ओळखले. या चौघांच्या चौकशीत आणखी दोघांचं नावं समोर आलं. तसेच या गुन्ह्यात एका अल्पवीय मुलाचा समावेश असल्याचंही उघड झालं. पण निर्भयाच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार त्याच अल्पवयीन मुलाने सर्वात जास्त अत्याचार केला होता.
तारीख : २१ डिसेंबर २०१२
पोलिसांनी दिल्ली- गाजियाबाद सीमेवरच्या आनंद विहार बस स्थानकावर त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. तो दिल्लीतून पळून जाण्याच्या बेतात होता.
तारीख : २२ डिसेंबर २०१२
सफदरजंग रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत असलेल्या निर्भयाने मॅजेस्ट्रेटसमोर आपला जबाब नोंदवला. त्याचवेळी पोलिसांनी बिहारच्या औरंगाबादमधून या प्रकरणातील सहावा आरोपी अक्षय ठाकूरला अटक केली. अक्षय आपल्या नातेवाईकाच्या घरी लपून बसला होता.
तारीख : २६ डिसेंबर २०१२
रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या निर्भयाची प्रकृती आणखीनच बिघडली. त्यामुळेच तिला उपचारासाठी सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात हलवण्यात आलं. विशेष विमानाने डॉक्टरची एक टीम आणि तिचे नातेवाईक सिंगापूरसाठी रवाना झाले.
तारीख : २९ डिसेंबर २०१२
सिंगापूरमधील डॉक्टरही निर्भयाचा जीव वाचवू शकले नाहीत. २९ डिसेंबरला निर्भयाने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला. निर्भयाच्या म़ृत्यूने हा देश खडबडून जागा झाला होता.
तारीख : १० सप्टेंबर २०१३
फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी आता पूर्ण... कोर्टानं चारही आरोपींना दोषी म्हणून दिलं करार
तारीख : १३ सप्टेंबर २०१३
दिल्लीतील साकेत कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय... दोषी मुकेश (वय २६), विनय शर्मा (२०), पवन गुप्ता (१९) व अक्षय सिंह ठाकूर (२८) या चौघांनाही सुनावली फाशीची शिक्षा
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.