नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने दिल्लीत ७० जागांपैकी ६७ जागांवर निर्विवाद विजय मिळवला. देशातील हा ऐतिहासिक विजय आहे. मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल हे दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात कोण असेल, याची उत्सुकता आहे. मनिष सिसोदिया यांना कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता आहे.
१४ फेब्रुवारी रोजी अरविंद केजरीवाल हे शपथ ग्रहण करणार आहेत. त्यांनी आम आदमीला या सोहळ्यासाठी बोलविले आहे. त्याचवेळी ते काही आमदार मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मनिष सिसोदिया यांना शिक्षण, शहर विकास आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाते मिळण्याची शक्यता आहे. तर सोमनाथ भारती यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड होईल.
सात आमदार मंत्री पदाची शपथ घेतील, अशी आशा आहे. मनिष सिसोदिया यांच्यासह गोपाल राय, आदर्श शास्त्री, इम्ररान हुसैन, वंदना कुमारी, सतेंद्र जैन आणि एस के बग्गा हे मंत्री पदाची शपथ घेतील, अशी सूत्रांची माहिती आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.