सोने-चांदीचा दर घसरला

सोने आणि चांदीच्या दरात बुधवारी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळा ३२५ रुपये तर, चांदीच्या दरात प्रतिकिलो ४९० रुपयांची घसरण झाली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 13, 2013, 12:02 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सोने आणि चांदीच्या दरात बुधवारी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळा ३२५ रुपये तर, चांदीच्या दरात प्रतिकिलो ४९० रुपयांची घसरण झाली आहे. नवी दिल्लीत बुधवारी दहाग्रॅम सोन्याचा दर २८,१९० तर, प्रतिकिलो चांदीचा भाव ४४,२०० रुपये होता.
विविध देशांच्या मध्यवर्ती बॅंका जागतिक विकासाला चालना देण्यासाठी आर्थिक पॅकेजेस देण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन आठवडयात प्रथमच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सामान्यत: सिंगापूरमधील सोन्याच्या दरांवरुन देशांतर्गत बाजारपेठेतील सोन्याचा दर ठरतो. तेथेही ०.३ टक्के घसरण झाली आहे.
सोन्याच्या दरात २३ मे नंतर प्रथमच ही घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सावरल्याचाही गुंतवणूदारांवर परिणाम झाला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत ९९.९ टक्के दहाग्रॅम शुध्द सोन्याचा भाव २८,१९० तर ९९.५ टक्के दहाग्रॅम शुध्द सोन्याचा दर २७, ९९० रुपये आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.