ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घटले

लग्नसराईच्या मोसमामध्ये सोन्याच्या भावांमध्ये घट पाहायला मिळाली आहे.

Updated: Apr 18, 2017, 07:52 PM IST
ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घटले  title=

नवी दिल्ली : लग्नसराईच्या मोसमामध्ये सोन्याच्या भावांमध्ये घट पाहायला मिळाली आहे. सोन्याबरोबरच चांदीचे भावही घसरले आहेत. सोन्याच्या आजच्या दरामध्ये ११४ रुपयांची घसरण झाली असून सोन्याचा भाव २९ हजार ३१६ रुपये प्रती तोळा एवढा आहे. तर चांदीही १५० रुपये किलोंनी घसरून ४२ हजार ८०० रुपये झाली आहे. जागतिक स्तरावर घसरलेले दर आणि सट्टेबाजांनी कमवलेल्या नफ्यामुळे सोन्या चांदीच्या भावामध्ये घसरण झाली आहे.