सुनेने केली सासूची निर्घृण हत्या

नवविवाहित सूनेनेच आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील बेहरोला येथे घडलीये.

Updated: Jul 7, 2016, 02:26 PM IST
सुनेने केली सासूची निर्घृण हत्या  title=

बेहरोला : नवविवाहित सूनेनेच आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील बेहरोला येथे घडलीये.

नवविवाहित सूनेला जेव्हा सासूने तिच्या प्रियकरासोबत आपत्तीजनक स्थितीत पाहिले तेव्हा तिला जोरदार धक्का बसला. या प्रसंगाची कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून सुनेने प्रियकरासोबत मिळून सासूचीच हत्या केली. 

अखेर पोलिसांना तपासादरम्यान ही माहिती उघड झाली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान सूनेने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली. या दोघांना अटक कऱण्यात आली असून कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.