पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाणाऱ्या मांझीला लाखोंची मदत

आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन तब्बल १० किमीची पायपीट करणाऱ्या ओडिशाचा गरीब आदिवासी दाना मांझीला बहारिनच्या पंतप्रधानांकडून मदत मिळालीये. 

Updated: Sep 17, 2016, 08:11 PM IST
पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाणाऱ्या मांझीला लाखोंची मदत title=

भुवनेश्वर : आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन तब्बल १० किमीची पायपीट करणाऱ्या ओडिशाचा गरीब आदिवासी दाना मांझीला बहारिनच्या पंतप्रधानांकडून मदत मिळालीये. 

बहारिनचे पंतप्रधान प्रिंस खलिफा बिन सलमान अल खलिफा यांनी ८ लाख ८७ हजार रुपयांची मदत केलीये. ही मदत आपल्या तीन मुलींच्या भविष्यासाठी बँकेत जमा कऱणार असल्याचे मांझी यावेळी म्हणाले. 

२४ ऑगस्ट रोजी अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने पत्नीचा मृतदेह घेऊन त्यांना तब्बल १० किमी पायपीट करावी लागली होती. ही घटना समोर आल्यानंतर विविध स्तरातून त्यांना मदतीचा हात पुढे होऊ लागला. सुलभ इंटरनॅशनल यांच्याकडून मांझीला ५ लाखांची मदत करण्यात आलीये. गुजरातमधील एका हिऱ्या व्यापाऱ्यानेही मांझीला २ लाखांची मदत केलीये.