दादरी हत्याकांड : ते गोमांस नव्हतंच तर मटण होतं...

उत्तरप्रदेशातील दादरी भागात गायीचं मांस खाण्याच्या आरोपाखाली जमावाकडून क्रूर हत्या करण्यात आलेल्या अखलाखच्या घरी होतं ते मांस गायीचं नव्हतं तर ते मटन असल्याचं सत्य समोर आलंय. 

Updated: Oct 9, 2015, 11:52 AM IST
दादरी हत्याकांड : ते गोमांस नव्हतंच तर मटण होतं...  title=

दादरी : उत्तरप्रदेशातील दादरी भागात गायीचं मांस खाण्याच्या आरोपाखाली जमावाकडून क्रूर हत्या करण्यात आलेल्या अखलाखच्या घरी होतं ते मांस गायीचं नव्हतं तर ते मटन असल्याचं सत्य समोर आलंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, गौतम बुद्धनगर प्रशासनानं अखलाखच्या घरी सापडलेल्या मांसाची पशु डॉक्टरांकडून तपासणी केली. त्यानंतर त्याला मथुरा लॅबमध्ये चौकशीसाठी पाठवण्यात आलं होतं. मिळालेल्या रिपोर्टनुसार, अखलाखच्या घरी सापडलेलं मांस म्हणजे गोमांस नव्हतं तर ते मटण होतं. 

अधिक वाचा : मोदी बोलले, हिंदू-मुस्लिमांनी एकत्रपणे गरीबीविरोधात काम करावे

9 दिवसांपूर्व जवळपास 200 जणांच्या जमावानं गोमांस खाण्याच्या केवळ संशयावरून अखलाकला घरातून बाहेर ओढत आणून त्याला अत्यंत क्रूर मारहाण केली होती. यात अखलाखचा मृत्यू झाला. तर अखलाखचा छोटा मुलगा - 22 वर्षांचा दानिश या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्यावर अजूनही नोएडाच्या एका हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. दानिश सध्या आयसीयूतून बाहेर आहे आणि तो कुटुंबीयांशी बोलू शकतोय. 

अधिक वाचा : शाही इमाम बुखारीच्या मुलाशी लग्नासाठी हिंदू मुलीने स्वीकारला इस्लाम?

या अत्यंत संतापजनक घटनेनंतर संपूर्ण देशात आक्रोश पसरलाय. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतरही संतप्त जमाव अखलाक आणि त्याच्या मुलाला जनावराप्रमाणे मारहाण करत होती. हे कुटुंब गेल्या 35 वर्षांपासून या गावात राहत आहे. 

अधिक वाचा : अखलाकनं स्वत:च्या बचावासाठी अखेरचा फोन केला हिंदू मित्राला

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.