टाटा समूहातल्या उलथा पालथीमुळे शेअर बाजार गडगडण्याची चिन्हं

 टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून अवघ्या 4 वर्षांत सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आलं आहे. रतन टाटा आणि अनेक संचालकांना त्यांची कार्यपद्धती मान्य नसल्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

Updated: Oct 25, 2016, 08:45 AM IST
टाटा समूहातल्या उलथा पालथीमुळे शेअर बाजार गडगडण्याची चिन्हं  title=

मुंबई : टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून अवघ्या 4 वर्षांत सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आलं आहे. रतन टाटा आणि अनेक संचालकांना त्यांची कार्यपद्धती मान्य नसल्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

टाटा समूहातल्या उलथा पालथीमुळे गुंतवणूकदार चांगलेच हादरले आहे. टाटा समुहातल्या या मोठ्या फेरबदलामुळे शेअर बाजार गडगडण्याची चिन्हं आहेत. टाटा कंपन्यांचे शेअर्सवर साऱ्या बाजाराची नजर लागून आहे.

रतन टाटा यांनी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना याबाबत पत्रही लिहिलं आहे. तसंच पुन्हा एकदा समूहाच्या नव्या नेतृत्वाचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलंय. त्यासाठी रतन टाटांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या संशोधन समितीमध्ये वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन आणि लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश करण्यात आला आहे. 

मिस्त्री यांना तडकाफडकी हटवण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्यांची कार्यशैली आणि तोटा कमी करण्यासाठी मालमत्ता विकण्याच्या धोरणावर टाटा समूहाच्या संचालक मंडळामध्ये नाराजी होती. दुसरीकडे मिस्त्री यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात जायची तयारी केली आहे.