नवी दिल्ली : देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत आहे. लहान-थोरांपासून सर्वांनी ध्वजारोहण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. राजधानी दिल्लीत मुख्य सोहळा होत आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद हे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आहेत.
देशात काही ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांची शक्यता असली तरी, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. दिल्लीत १ लाख २३ हजार सुरक्षाकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.