भारताच्या ‘मंगळ मिशन’चं काउंटडाऊन सुरू

भारताच्या महत्वकांक्षी मंगळ मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी अवकाशयानाच्या प्रक्षेपणासाठी ५६ तास ३० मिननिटांचं अंतिम काउंटडाऊन सुरू करण्यात आलं.

Updated: Nov 3, 2013, 03:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
भारताच्या महत्वकांक्षी मंगळ मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी अवकाशयानाच्या प्रक्षेपणासाठी ५६ तास ३० मिननिटांचं अंतिम काउंटडाऊन सुरू करण्यात आलं.
या मंगळ मोहिमेसाठी अवकाशयानाच्या प्रक्षेपणाची वेळ ५ नोब्हेंबरला दुपारी २ वाजून ३६ मिनिटं अशी निच्छित करण्यात आलीये. PSLV-XL या प्रक्षेपणाद्वारं १३३७ किलोग्रॅम वजनाचा उपग्रह मंगळाच्या कक्षेत सोडण्यात येणार आहे. या अवकाशयानाबरोबर पाच वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं असून त्याद्वारं मंगळाच्या कक्षेत विविध प्रयोग केले जाणार आहेत.

‘द लॉंच ऑथराइजेशन बोर्ड’ नं १ नोव्हेंबरला एमओएमच्या प्रक्षेपणासाठी मंजुरी दिली होती. याच्या एक दिवस आधी प्रक्षेपणाचा यशस्वीरित्या अभ्यास केला होता. मिळालेल्या माहितीनुसार रॉकेट प्रक्षेपणानंतर उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत लगबग ४० मिनटात स्थापन करणार आहेत. इस्त्रोंच्या सूत्रांनी सांगितलं की प्रक्षेपक वाहनावर नजर ठेवणाऱ्या केंद्रांना अॅलर्ट केलं गेलं आहे. यामध्ये पोर्टब्लेअर, बंगळुरूचं ब्याल आणि दक्षिण पॅसिफिक महासागरात तैनात भारतीय शिपींग कॉर्पोरेशनचं जहाज एससीआई नालंदा आणि एससीआई यमुनामध्ये टर्मिनल सामाविष्ट करण्यात आले आहेत.
प्रक्षेपणानंतर उपग्रह २० ते २५ दिवसांसाठी पृथ्वी भोवती फिरणार आहे आणि मग १ डिसेंबरला पूर्ण ९ महिन्यांसाठी लाल ग्रहाच्या पृष्टभागावर उतरेल. उपग्रह २४ सप्टेंबर २०१४मध्ये मंगळ कक्षेत पोहोचणार आहे. जर भारताचं हे ४५० कोटी रुपये खर्चून करण्यात येत असलेलं ‘एमओएम मिशन’ यशस्वी झालं, तर ते अमेरिका, रूस आणि युरोप नंतर भारत मंगळावर स्वारी करणारा चौथा देश असेल.
युरोपीय देशांची युरोपीय अंतरिक्ष एजन्सी (ईएसए), अमेरिकेची ‘नासा’ आणि रुसची ‘रोस्कॉस्मॉस’ या तीन एजेन्सींनी आतापर्यंत लालग्रह मोहीमेत यशस्वी झाले आहेत. मंगळसाठी आतापर्यंत ५१ अभियान संपन्न झालं, त्यातले केवळ २१ यशस्वी झाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.