नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारनं मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसनं तिखट प्रतिक्रिया दिलीय. यावेळी, त्यांनी प्रकाश जावडेकरांच्या निवडीवरही अनेक प्रश्नचिन्ह उभे केलेत.
प्रकाश जावडेकरांना मनुष्यबळ विकास मंत्री बनवणं हा सार्वजनिक शिक्षण प्रणाली खाजगी क्षेत्रात वळवण्याचा 'व्यवस्थित प्रयत्न' असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी म्हटलंय. पर्यावरण मंत्रालयाच्या कार्यकाळादरम्यान, खाजगी संस्थांवर उदार झालेल्या प्रकाश जावडेकरांचा इतिहास पाहता ही शंका उपस्थित होऊ शकते, असंही त्यांनी म्हटलंय.
पर्यावरणाला नुकसान पोहचवणाऱ्या एका धनाढ्य उद्योगपतीवर लावण्यात आलेला २०० करोड रुपयांचा दंड 'उदार' जावडेकरांनी माफ केला होता. या पार्श्वभूमीवर जावडेकरांकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यभार सोपवणं हे 'अशुभ आणि भयंकर' आहे.