विधानसभा जागा वाटपाचा खल आज दिल्लीत

काँग्रेस एनसीपीचा विधानसभा निवडणूकीतील जागा वाटपासाठी आज दिल्लीला महत्वपूर्ण बैठक होतेय. 

Updated: Aug 19, 2014, 10:05 AM IST
विधानसभा जागा वाटपाचा खल आज दिल्लीत title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : काँग्रेस एनसीपीचा विधानसभा निवडणूकीतील जागा वाटपासाठी आज दिल्लीला महत्वपूर्ण बैठक होतेय. 

या बैठकीला राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार तर काँग्रेसकडून अहमद पटेल, ए.के. एन्टनी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. 

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने निम्म्या म्हणजेच 144 जागांचा आग्रह धरला होता तर काँग्रेस एकही जागा वाढवून द्यायला तयार नव्हती. 

महत्त्वाचं म्हणजे, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसने माघार घेऊन आपल्या हक्काच्या जागेवर पाणी सोडलं. ही माघार घेताना काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये तडजोड झाल्याचं बोललं जातंय.

या तडजोडीनुसार एनसीपीने निम्म्या जागांचा आग्रह सोडावा, असं ठरल्याचंदेखील समजतंय. काँग्रेस राष्ट्रवादीसाठी 124 ते 130 जागा सोडायला तयार आहे. 

आजच्या बैठकीमध्ये याबबत चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर परवा 20 ऑगस्टला राज्यातील नेत्यांची जागा अदला-बदलीबाबत बैठक होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.