पंतप्रधानांच्या शिक्षणाचा खुलासा होणार

केंद्रीय सुचना आयुक्त म्हणजेच सीआयसीनं दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीबाबत टाकण्यात आलेल्या आरटीआयची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. 

Updated: Apr 29, 2016, 10:29 PM IST
पंतप्रधानांच्या शिक्षणाचा खुलासा होणार title=

नवी दिल्ली: केंद्रीय सुचना आयुक्त म्हणजेच सीआयसीनं दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीबाबत टाकण्यात आलेल्या आरटीआयची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी किती शिकले, याबाबत त्यांनी माहिती द्यावी, असं आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं. या मागणीचं पत्र केजरीवालांनी सीआयसीला लिहीलं होतं. त्यानंतर सीआयसीनं हे आदेश दिले आहेत. 

पंतप्रधान कार्यालयानंही मोदी किती शिकले आहेत, त्याबाबत माहिती द्यावी, यामुळे दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला रेकॉर्ड शोधायला मदत होईल, असं सीआयसीनं सांगितलं आहे. 

मोदींच्या शिक्षणाबाबत खुलाशाच्या मागणीसाठी केजरीवालांनी आरटीआय दाखल केला होता, त्यानंतर सीआयसीनं हे पाऊल उचललं आहे. निवडणुकीच्या ऍफिडेव्हिटमध्ये शिक्षणाबाबतची माहिती देणं आवश्यक नाही, पण एखाद्या मुख्यमंत्र्यानं पंतप्रधानांकडे त्यांच्या शिक्षणाबाबतची माहिती मागितली तर ते देण्यात काहीच गैर नसल्याचं मत सीआयसीनं मांडलं आहे.