चर्च बनले मंदिर, ७२ जणांनी स्वीकारला हिंदू धर्म

अलिगडमध्ये सेवंथ डे एडवेंटिस्टसशी संलग्न असलेले चर्च रातोरात शिवमंदिरात बदलण्यात आला. १९९५ मध्ये हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या वाल्मिकी समाजाच्या ७२ जणांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. चर्चमध्ये ज्या ठिकाणी क्रॉस लावण्यात आला होता. त्या ठिकाणी शिव प्रतिमा लावण्यात आली. हिंदू संघटनेने या ‘घर वापसी’ म्हटले आहे. 

Updated: Aug 28, 2014, 10:43 AM IST
चर्च बनले मंदिर, ७२ जणांनी स्वीकारला हिंदू धर्म title=

अलिगड: अलिगडमध्ये सेवंथ डे एडवेंटिस्टसशी संलग्न असलेले चर्च रातोरात शिवमंदिरात बदलण्यात आला. १९९५ मध्ये हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या वाल्मिकी समाजाच्या ७२ जणांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. चर्चमध्ये ज्या ठिकाणी क्रॉस लावण्यात आला होता. त्या ठिकाणी शिव प्रतिमा लावण्यात आली. हिंदू संघटनेने या ‘घर वापसी’ म्हटले आहे. 

मंगळवारी अलिगडपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या असरोईतील चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात शुद्धीकरण करण्यात आले. १९ वर्षांपूर्वी ख्रिस्ती झालेल्या ७२ जणांनी हिंदू धर्म स्वीकारला. या चर्चमध्ये लावण्यात आलेला क्रॉस हटवून गेटच्या बाहेर ठेवण्यात आला आहे. तसेच त्या ठिकाणी शिव प्रतिमा लावण्यात आली आहे. 

या लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला अशी बातमी पसरल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. लोकल इंटेलिजन्स युनिटला घटनास्थळी पाचरण करण्यात आले. आता शिव प्रतिमा हटवून एका घरात ठेवण्यात आली आहे. 
संघ प्रचारक आणि धर्म जागरण संघटनेचे प्रमुख खेम चंद्र यांनी सांगितले, की याला धर्मांतर नाही म्हणता येणार याला घरात परतणे म्हणतात. ते आपल्या मर्जीने हिंदू धर्म सोडून गेले होते. त्यांना जेव्हा वाटले की आपण चूक केली आहे. तेव्हा ते पुन्हा हिंदू धर्मात आले. ७२ वाल्मिकींनी पुनर्धमांतरणवर खे यांनी सांगितले, की आम्ही त्यांचे स्वागत करतो. आम्ही आमच्या समाजाला विस्कळीत होऊ देणार नाही. 

हिंदू धर्मात परतलेल्या अनिल गौड यांनी सांगितले की, आम्ही जाती व्यवस्थेला कंटाळून हिंदू धर्म सोडला होता. पण ख्रिश्चनांमध्ये आमची स्थिती काही चांगली नव्हती. आम्ही जेव्हा हिंदू होतो, तेव्हा आम्हांला समाजात मान नव्हता आम्ही छोटे कामं करीत होतो. १९ वर्ष ख्रिश्चन होतो, पण आमच्या समाजासाठी त्यांनी काही मदत केली नाही. कोणत्याही मोठा दिवस साजरा केला जात नव्हता. मिशनरींनी केवळ एक चर्च बनवून दिले होते. 

अलिगडमधील वकील आणि ख्रिश्चन समुदायाचे नेते ओजमंड चार्ल्स यांनी या प्रकाराला असहमती दर्शवली. त्यांनी सांगितले, घर वापसी ही मला कटाचा भाग वाटते. कधी आपण ‘लव्ह जिहाद’ तर कधी ‘घर वापसी’च्या गोष्ट होत आहे. हे काय हिंदू राष्ट्र बनविण्याचा संकेत आहे का?  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.