सीमाभागात चीनने घुसखोरी केल्याचं उघड

सीमाभागात चीनच्या कुरापती सुरूच आहेत. भारत-चीन सीमेवर लडाख भागात चीनी  सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याचं उघडकीस आलं. 

Updated: Sep 14, 2014, 04:28 PM IST
सीमाभागात चीनने घुसखोरी केल्याचं उघड title=

लडाख : सीमाभागात चीनच्या कुरापती सुरूच आहेत. भारत-चीन सीमेवर लडाख भागात चीनी  सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याचं उघडकीस आलं. 

11 सप्टेंबर रोजी लडाखमधील डेमचौक भागात 30 चीनी सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केलीये.  चीन सैनिक भारतीय सीमेच्या आत ५०० मीटर आले होते, असंही सांगण्यात येतंय.

या चीनी सैनिकांनी भारताच्या हद्दीत सुमारे 500 मिटर आत तंबू ठोकल्याचंही उघडकीस आलंय. लवकरच चीनचे पंतप्रधान भारत भेटीवर येणार आहेत, याआधीच ही घुसखोरी झाल्याचं समोर आलं आहे. यापूर्वीही चीनने घुसखोरीचे प्रकार केल्याचं समोर आलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.