चेन्नईएक्स्प्रेसमधील बिर्याणीत अळी

Updated: Nov 11, 2014, 04:56 PM IST
चेन्नईएक्स्प्रेसमधील बिर्याणीत अळी title=

 

 

चेन्नई: मुंबई एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका डोंबिवलीकर कुटुंबीयांनी गाडीतील रसोईतून मागविलेल्या बिर्याणीत एक भली मोठी अळी असल्याचे निदर्शनास आले. 

या कुटुंबीयांनी तात्काळ रसोईखान्यातील व्यवस्थापकाशी संपर्क साधला.

 तेव्हा तक्रार करणाऱ्या कुटुंबीयांना रसोईतील लोक उर्मट उत्तरे देऊन तक्रार ऐकून घेण्यास नकार देत होते.

गेल्या बुधवारी डोंबिवलीतील विवेक पाठक व त्यांचे कुटुंबीय तिरूपतीहून मुंबईकडे चेन्नई मुंबई एक्स्प्रेसने येत होते.

गाडीतील रसोईतून त्यांनी बिर्याणी मागवली.

बिर्याणीमध्ये अळी असल्याचे निदर्शनास आले.

पाठक यांनी तात्काळ रसोईखान्यातील व्यवस्थापकाच्या ही बाब निदर्शनास आणली.

व्यवस्थापकाने 'आमच्याकडून असे काही झालेच नाही' असे म्हणून हात झटकले.

लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील रसोईतून दर्जेदार भोजन प्रवाशांना मिळाले पाहिजे म्हणून केंद्रात भाजप सरकार आल्यापासून हालचाली सुरू आहेत.

प्रत्यक्षात अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये प्रवाशांना विदारक अनुभव येत आहेत. अनेक वेळा रसोईतील जेवण चांगले नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
गाडीतील कर्मचारी तक्रारी ऐकून घेण्याऐवजी प्रवाशांना खोटे पाडण्याचे प्रकार वाढले आहेत. 
रेल्वे टी.सी ने मात्र बिर्याणीत अळी असल्याचे मान्य केले. याबाबत विवेक पाठक यांनी रेल्वेच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल केली आहे.

असे भोजन देणाऱ्या व्यवस्थापकावर व रसोईखान्यातील उद्धट कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.